जिल्ह्यात बसवण्यात येणारे प्रीपेड मीटरचे धोरण गरीब जनतेवर अन्याय करणारे…

अँड.संदीप निंबाळकर:लवकरच जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या बैठका घेऊन जन आंदोलन उभारणार..

सावंतवाडी ता.२८-: शासनाने प्रीपेड वीज मीटर बसविण्याचे धोरण आखले असून लवकरच हे मीटर जिल्ह्यात बसवण्यात येणार आहे हे प्रीपेड मीटरचे धोरण गरीब जनतेवर अन्याय करणारे ठरणार आहे त्यामुळे या शासनाच्या धोरणाला जनतेने संघटितपणे विरोध उभा केला पाहिजे यासाठी लवकरच जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या बैठका घेऊन जन आंदोलन उभारण्यात येईल अशी माहिती याचे एडवोकेट संदीप निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महेश परुळेकर रफिक मेमन नंदू पाटील विजया चिंडक मोहन जाधव अंबादास इंगळे आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page