⚡सावंतवाडी ता.२९-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून चराठा येथे त्यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचा कलाशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.दरम्यान सायंकाळी उशिरा इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला देखील कीर्तन प्रेमींनी मोठी गर्दी उसळून मोठा आनंद लुटला.
