सिंधुदुर्गनगरीत वीज, पाऊस आणि वाऱ्याचे तांडव…

वीज गायब तर रस्त्यात झाडे पडल्याने वाहतूक ठप्प.. ओरोस ता २२बुधवारी संध्याकाळी सवा पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिंधुदुर्गनगरीत मोठ्या प्रमाणात झाडे मोडून आणि मुळासकट रस्त्यावर कोसळल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. तसेच ओरोस फाटा येथील दुकानांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने झाडे रस्त्यावर कोसळली त्यावेळी वाहने किंवा माणसे…

Read More

वीज कोसळून गाय गतप्राण…

वेताळ बांबर्डे – देऊळवाडी येथील घटना:कुडाळ तालुक्यात बुधवारी जोरदार मेघगर्जना पडला पाऊस.. ⚡कुडाळ ता.२२-: कुडाळ तालुक्यात बुधवारी संध्याकाळी जोरदार मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून गाय मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. वेताळ बांबर्डे – देऊळवाडी येथील राहणारे गुणेश बांबर्डेकर यांची गाय झाडाखाली बांधून ठेवण्यात आली होती. बुधवारी संध्याकाळी ४ पासून विजांच्या जोरदार कडकडाटासह पाऊस सुरू झाला….

Read More

मुसळधार कोसळलेल्या पावसाने बांदा शहरात हाहाकार…

झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांची हानी:भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान… ⚡बांदा ता.२२-: वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसाने बांदा शहरात आज हाहाकार माजवीला. शहरात ठिकठिकाणी वीज वाहक तारांवर झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली. शहरातील गाडगेवाडी येथील भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले….

Read More

सोनुर्ली माऊली मंदिरात 23 रोजी विविध कार्यक्रम…

परब कुंटूबियांचे आयोजन ; लाभ घेण्याचे आवाहन.. सावंतवाडी ता.२२-:सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ…

Read More

मालवणात २५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

⚡मालवण ता.२२-: लायन्स क्लब मालवण, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स पुरस्कृत अॅपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ मे रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात उच्च रक्तदाब, ब्लड कँसर, मधुमेह, थायरॉईड, हृदय, पोट व मेंदू विकार, किडनीचे आजार, स्त्री…

Read More

सुशांत नाईक यांच्याकडून रामचंद्र घाडी यांना मदत…

⚡कणकवली ता.२२-: तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचामुळे साकेडी-फौजदारवाडी येथील रामचंद्र घाडी यांचे घरावर झाड पडून नुकसान झाले होते. घाडी यांना युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्वखर्चातून पत्रे दिले. यावेळी मुरारी राणे, नामदेव सावंत, सागर मेस्त्री, सुनील घाडी, कृष्णा तेली आदी उपस्थित होते. ही मदत केल्याबद्दल घाडी यांनी नाईक यांचे आभार मानले.

Read More

स्वयंभू मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 23 मे रोजी मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वा. धार्मिक विधी, रुद्र स्वाहाकार, अभिषेक, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळच्या सत्रात भजने सादर होतील. रात्री 9 वा. खानोलकर दशावतार नाट्यमंडळ खानोली यांचा ट्रिकसीनयुक्त हर्षला अयोध्या नगरी हा…

Read More

आपत्तीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात…

जिल्हा प्रशासनाकडे राजेंद्र पेडणेकर यांची मागणी.. ⚡कणकवली ता.२२-: पावसाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्तींच्या घटना घडतात. यंदाच्या पावसाळ्यात या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजाना कराव्यात, अशी मागणी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात दरड कोसळणे, पूर येणे, झाडे पडणे, विद्युत पोल व विद्युत तारा तुटणे यासह अन्य आपत्तीच्या घटना…

Read More

कणकवली पं.स.मध्ये दहशतवाद, हिंसाचार विरोधी दिन साजरा…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली पंचायत समितीमध्ये दशहतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत दशहतवाद व हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली. यावेळी मनीषा देसाई, सूर्यकांत वारंग, सी. डी. परब, सुनील पांगम, रवी मेस्त्री, अनिल चव्हाण, विठ्ठल ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read More

कणकवली पं.स.मध्ये दहशतवाद, हिंसाचार विरोधी दिन साजरा…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली पंचायत समितीमध्ये दशहतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत दशहतवाद व हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली. यावेळी मनीषा देसाई, सूर्यकांत वारंग, सी. डी. परब, सुनील पांगम, रवी मेस्त्री, अनिल चव्हाण, विठ्ठल ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page