देवगड ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या मागणीनुसार लवकरच डायलिसिस मशीन उपलब्ध करून देणार…

आमदार नितेश राणे:आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत देवगड येथे रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न..

⚡देवगड ता.२७-: देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आणखी एक डायलिसिस मशीन  देण्यासंदर्भात आमदार नितेश राणे यांच्याकडे आज देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने मागणी केली हे मशीन आपण प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.


देवगड ग्रामीण रुग्णालय येथे आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक शुक्रवारी संपन्न झाली. यावेळी देवगड ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. इंगळे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश पाटोदेकर, डॉ संजय विटकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता बासुतकर, तालुका आरोग्य अधिकारी उमेश पाटील, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव,पदाधिकारी बाळ खडपे प्रकाश राणे, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळसकर,सर्व नगरसेवक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन डायलिसिस मशीन यापूर्वीच दिली आहेत .मात्र रुग्णांची संख्या पाहता आणखीन एक डायलिसिस मशीनची गरज देवगड ग्रामीण रुग्णालयाला आहे ही डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्याच्या आश्वासन या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.याबरोबर
देवगड ग्रामीण रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्ता सुस्थितीत करणे, जनरेटर साठी शेड, इन्वर्टर साठी बॅटऱ्या, तसेच अनेक इमारतीची कामे करून घ्यावीत अशी मागणी वैद्यकीय अधीक्षक यांनी केली याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवून द्यावा व त्याची कार्यवाही करावी असे आमदार नितेश राणे यांनी सुचित केले . देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये योग्य तो औषध गोळ्या पुरवठा पुरेशा प्रमाणात असल्याचे प्रशासनाने सांगितले .मात्र उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी अपुरा औषध पुरवठा असल्याचे नमूद केले. यासाठी योग्य तो औषध साठा वेळेवर करण्याच्या सूचना आमदार नितेश राणे यांनी केल्या.

You cannot copy content of this page