ईनामदार श्री भगवती देवी संस्थान कोटकामते यांचेमार्फत विदयार्थ्यानाशैक्षणिक साहित्य वाटप…

⚡देवगड ता.२७-: ईनामदार श्री भगवती देवी संस्थान कोटकामते या विश्वस्त मंडळाकडून
कोटकामते परिसरातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम माध्यमिक विद्यामंदिर कोटकामते येते संपन्न झाला.
यामध्ये श्री भगवती माध्यमिक विदयालय कोटकामते,केंद्रशाळा कोटकामते नं. १, प्राथ.शाळा दाभलवाडी,प्राथ. शाळा भरडवाडी आणि प्राथ.शाळा आडीवरे या कोटकामते मधील सर्व शाळेतील विदयार्थ्यांना ईनामदार श्री भगवती देवी संस्थान कोटकामते यांचेकडून शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. यावेळी इनामदार श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामतेचे अध्यक्ष डॉ .मुकुल प्रभुदेसाई, माध्यमिक विद्यामंदिर कोटकामते प्रशालेचे मुख्याध्यापक शुभाष
दहिबावकर, संजीव मेजारी,उपाध्यक्ष लक्ष्मण पाटकर, सचिव गुरुदास घाडी,खजिनदार तेजपाल तांबे, विश्वस्त महेंद्र मेस्त्री, देवस्थान लिपिक संतोष मेस्त्री, श्री भगवती शिक्षण सहाय्यक मंडळ कोटकामते
संस्था सदस्य मोंडे सर, केंद्रशाळा कोटकामते नं.१ चे सर्व शिक्षक वृंद
उपस्थित होते.

You cannot copy content of this page