कुडोपी ग्रामस्थांचा इशारा:बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना त्रास सहन करावा लागू शकतो..
⚡मालवण ता.२७-: कुडोपी रस्त्यावर वाढलेल्या झाडीचा फटका एसटी महामंडळास बसून एसटी चे नुकसान होत असल्याच्या कारणास्तव गाड्या बंद करण्याचा इशारा महामंडळाकडून लेखी पत्राद्वारे कुडोपी बुधवळे ग्रामपंचायतला देण्यात आला आहे.यामुळे एसटी बंद झाल्यास कुडोपी मधून आचरा भागात शाळा,हास्पिटल बाजारा साठी येणारया मुलांना ग्रामस्थांना बसणार आहे. यामुळे कुडोपी ग्रामस्थ आक्रमक झाले असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही न केल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा येथील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
याबाबत बुधवळे कुडोपी ग्रामपंचायतीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आलेल्या पत्रात मालवण आगारातून कुडोपी गावात सुरू असलेल्या एसटी बस रस्त्याच्या बाजूला साईड पट्टीचा भाग खचल्याने गाडी वळविताना चाक रुतून बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच रस्ता दुतर्फा झाडी वाढल्याने झाडाच्या फांद्या बसवर आदळून बसची काच फूटणे,आरसा फूटणे इत्यादी प्रकारे बसचे नुकसान होत आहे.त्यात चालकांना जबाबदार धरून नुकसान भरपाई केली जात आहे.यात त्यांचे नाहक नुकसान होत आहे.तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी महामंडळाकडून करण्यात आली.त्यानंतरच वाहतूक पुर्वीप्रमाणे करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे कुडोपीमधून आचरा येथे शाळेत जाणाऱ्या अकरा मुलांना त्रास सहन करावा लागू शकतो तसेच बाजार,आरोग्य सुविधेसाठी आचरा येथे कायम येजा केली जात असते.एसटी बंद झाली तर त्याचा फटका विद्यार्थी वृद्धांना बसू शकतो असे मत बंड्या पडवळ यांनी व्यक्त करुन तातडीने रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे तोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .यावेळी त्यांच्या सोबत हेमंत पडवळ,राजू हिर्लेकर,प्रविण मुणगेकर, बाळकृष्ण पडवळ,अनिल हिर्लेकर, शंकर हिर्लेकर, प्रांजल पडवळ, प्रतिक्षा पडवळ, प्रियांका मुणगेकर, रेखा पडवळ,निशा पेडणेकर यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
