मानसी पालव:बांधावरची शाळा” हा उपक्रम बिळवस येथे उत्साहात संपन्न..
⚡मालवण ता.२७-: आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात “पारंपारिक शेती” कोठेतरी मागे पडताना दिसते. आपला शेतकरी अर्थात बळीराजा खूप मेहनत घेऊन शेती पिकवत असतो. या शेतीमधून मिळालेल्या उत्पन्नातून तो आपले संपूर्ण कुटुंब चालवतो असतो. आर्थिक, भौगोलिक, नैसर्गिक अशा सर्व संकटांचा सामना करत हा शेतकरी राजा मोठया हिमतीने आपली शेती करत असतो. अशा या शेतीतून कष्ट करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मनावरती संस्कार रुजविणाऱ्या या दोन्ही शाळांचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत मिळवत सरपंच मानसी पालव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
जि. प. प्राथमिक शाळा बिळवस देऊळवाडा व बिळवस नंबर 1 या दोन्ही शाळांचा “बांधावरची शाळा” हा उपक्रम नुकताच बिळवस येथे संपन्न झाला.
यावेळी प्रगत शेतकरी श्री. दिनेश पालव, त्यांचे कुटुंब, शिक्षक श्री. उदय कदम, श्री. सुषण ढवण, श्री. उमेश राठोड, विद्यार्थी,शाळा कमिटी,पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमासाठी केंद्र प्रमुख श्री. नंदकिशोर गोसावी सर, सरपंच सौं. मानसी पालव,शेतकरी श्री. दिनेश पालव,शाळा कमिटी अध्यक्ष सौं. सिद्धी पालव, सर्व सदस्य, पालक, व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
