रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात कांदळवन दिन संपन्न….

⚡मालवण ता.२७-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परूळेकर कनिष्ठ महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासन कांदळवन वनविभाग व कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण सप्ताह अंतर्गत जागतिक कांदळवन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खारफुटी वनांमधील जैवविविधता, खारफुटी वनाचे विविध प्रकार, उपयोग यांची माहिती दिली.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिलजा उपजीविका तज्ज्ञ केदार पालव, जिल्हा समन्वयक अधिकारी रोहित सावंत, प्रकल्प समन्वयक दीपक जाधव, प्रकल्प सहाय्यक पुणे मयूर पानसरे, प्रकल्प समन्वयक शुभम सामंत व श्री. आचरेकर आदी उपस्थित होते.

कांदळवने ही किनारी भागातील अतिशय महत्त्वाची परिसंस्था आहे. ही वने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मदत करतात. तसेच अनेक लोकांना उपजीविका पुरवतात. या कांदळवनाचे संवर्धन व संरक्षण करणे आज काळाची गरज आहे, असे यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगून विद्यार्थ्यांना माहिती दिली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कांदळवन प्रतिष्ठान तर्फे पौष्टिक खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले, तसेच कांदळवन माहितीपर पुस्तक संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. बर्वे यांनी केले व प्रास्ताविक सौ. कदम यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. धामापूरकर यांनी केले.

You cannot copy content of this page