गणित संबोध परीक्षेत सावंतवाडी 4 नं. शाळेचे उल्लेखनीय यश…!
⚡सावंतवाडी ता.२८-: ऑगस्ट मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेला या शाळेतील इयत्ता 5 वी मधील एकूण 13 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 100% लागला आहे. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व विद्यार्थी पुढील प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना गणित विषय शिक्षक श्री. महेश पालव सर यांचे मार्गदर्शन लाभले….
