गणित संबोध परीक्षेत सावंतवाडी 4 नं. शाळेचे उल्लेखनीय यश…!

⚡सावंतवाडी ता.२८-: ऑगस्ट मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेला या शाळेतील इयत्ता 5 वी मधील एकूण 13 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 100% लागला आहे. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व विद्यार्थी पुढील प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

या पैकी काव्या अमित तळवणेकर, वीरा राजीव घाडी, मानवी महेश घाडी, स्वरा गोविंद शेर्लेकर, पार्थ अशोक बोलके, हार्दिक अनिल वरक या सहा विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळविले आहेत. 

या सर्व विद्यार्थ्यांना गणित विषय शिक्षक श्री. महेश पालव सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग यांनी विशेष अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page