वराड गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अमित ढोलम यांची निवड…!

मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील वराड ग्रामपंचायत येथे सरपंच सौ. शलाका समीर रावले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेमध्ये अमित उर्फ छोटू ढोलम यांची वराड गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. गावात विविध ग्रुपच्या माध्यमातून आणि जिल्ह्यात आभाळमाया ग्रुपच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करत असलेल्या अमित ढोलम यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. अमित उर्फ छोटू ढोलम यांच्या सामाजिक कार्याच्या अनुभवाचा आणि लोकसंपर्काचा ग्रामपंचायत आणि गावासाठी उपयोग होईल असे मत सरपंच सौ. शलाका रावले यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page