शिवाजी वाचन मंदिरच्या अध्यक्षपदी डॉ. सुभाष दिघे…!

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर वाचनालयाची वार्षिक सभा वाचनालयाच्या सभागृहात संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा मेधा शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. सुभाष मधुकर दिघे यांची निवड करण्यात आली.

शिवाजी वाचन मंदिरची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष- श्रीधर दत्तात्रय काळे, कोषाध्यक्ष- विजय चंद्रकांत अटक, कार्यवाह-वैदेही महेश जुवाटकर, सहकार्यवाह- सच्चिदानंद वसंत गोलतकर, सदस्य-प्रभूदास लक्ष्मण आजगावकर, अक्षता अजित बांदेकर, रत्नाकर रवींद्र कोळंबकर, हेमा प्रफुल्ल परुळेकर, जयराम बापूजी परुळेकर, मेधा रघुनाथ शेवडे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवप्रसाद अंकुश चौकेकर यांनी काम पाहिले. वैदेही जुवाटकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page