निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिर निगुडे येथे उद्या हरिनाम सप्ताह…

⚡बांदा ता.२८-: निगुडे श्री देवी माऊली मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उद्या सकाळी माऊली मंदिर निगुडे येथे हरिनाम सप्ताह होणार आहे तरी सकाळपासून भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच पंचक्रोशी मधील रात्री ग्रामस्थांची भजने होणार आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी माऊली देवस्थान…

Read More

शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकार जबाबदार…

जयंत पाटील:मंत्री दीपक केसरकर यांच वक्तव्य दुर्दैवी;त्यामुळे आता या भागाचा आमदार बदला… ⚡सावंतवाडी ता.२८-: मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे त्याने नेव्हीवर उगाच टीका करू नये किंवा दोष देऊ नये या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या चौकशी समितीमध्ये विधान परिषद व विधानसभेचे अध्यक्ष व सेवानिवृत्त न्यायाधीश यांचा…

Read More

बांदा बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त ठेवा…

राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या पाश्र्वभूमीवर ठाकरे शिवसेनेची मागणी.. बांदा/प्रतिनिधीदेशासह राज्यात सध्या महिलांवर अत्याचाराच्या घटना या सातत्याने घडत असून बांदा शहरातही रोडरोमिओकडून महिला व विशेषतः महाविद्यालयीन युवतीना त्रास होऊ नये यासाठी शाळा सुटण्याच्या वेळी बांदा बसस्थानकावर पोलीस कर्मचारी तैनात ठेवावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांना…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत बावशी येथील संदीप तांबे या तरुणाचा मृत्यू…

⚡कणकवली ता.२७-: देवगड निपाणी रस्त्याने बावशी येथे जाणाऱ्या मोटरसायकलला अज्ञात चार चाकी वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बावशी येथील संदीप गणपत तांबे (४०) यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आरती तांबे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात सोमवारी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास वाघेरी फाटा येथे झाला. याप्रकरणी नारायण बापू मांडवकर यांच्या फिर्यादीवरून…

Read More

करूळ गावात घेतले कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या कृषीकन्यांनी मशरूम उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक…

⚡वैभववाडी ता.२७-: श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालय सांगुळवाडी अंतर्गत कृषीकन्या ( जामदारवाडी – करुळ ) यांनी व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अळंबीमध्ये, धिंगरी (Oyster – white) अळंबी लागवडीची पद्धत अत्यंत सुलभ आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या अळंबीच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारच्या माध्यमाची (पदार्थाची) आवश्यकता नाही. ज्याचे विघटन सहज आणि त्वरीत…

Read More

जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी मी सक्षम…

खा. नारायण राणेसावंतवाडीत संजू परब यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट.. सावंतवाडी ता. २७ -: मालवण येथे झालेली घटना दुदैवी आहे त्याचे राजकारण केले जाऊ नये. मी उद्या दुपारी त्या ठिकाणी भेट देणार आहे. काही पक्षांचे नेते जिल्हयात येणार आहेत मात्र कितीही जण आले तरी मी या जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी मी सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय…

Read More

सिंधुदुर्गवासीय शिवप्रेमींनी मोर्चात सहभागी व्हावे…

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन.. ⚡कणकवली ता.२७-: मालवण किल्ल्यावर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने घाईगडबडीने निकृष्ट बांधकाम करुन उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी जमीनदोस्त झाला. यामुळे जगभरातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असुन सर्वसामान्य जनतेमध्ये केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात…

Read More

शिवरायांचा पुतळा पंचधातुचा नाही…

आमदार वैभव नाईक यांची माहिती: राजकोट किल्ल्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप.. ⚡कणकवली ता.२७-: मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामत कामात भ्रष्टाचार झाला आहे. पालकमंत्र्यांनी बगलबच्छा कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी या एवढ्या मोठ्या कामाची ६ मजुर संस्थांना २५ – २५ लाखांची कामे दिली. त्याच धर्तीवर आपटे नामक ठेकेदाराला छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम अनुभव नसताना पालकमंत्र्यांनी…

Read More

इन्सुली गावातील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेचा केला निषेध…

बांदा ता.२७-:मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध म्हणून इन्सुली गावातील शिवप्रेमींनी केला. महामार्गावरील इन्सुली खांमदेव नाका येथे मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी संबंधित बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. तर घडलेली घटना निषेधार्ह असून दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांनी केली. यावेळी सरपंच तात्या…

Read More

संदीप गावडे यांचा प्रत्येक कार्यक्रम देखणा व वैविध्यपूर्ण…

प्रभाकर सावंत:आरपीडीच्या मैदानावर संदीप गावडे आयोजित दहीहंडी महोत्सवाचे शानदार उद्घाटन;अभिनेत्री दिव्या फुगावकर यांच्या उपस्थितीने आणली अनोखी रंगत.. ⚡सावंतवाडी ता.२७-: संदीप गावडे यांनी आयोजित केलेला प्रत्येक कार्यक्रम हा देखणा व वैविध्यपूर्ण असतो. या सर्व सोहळ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचाशतप्रतिशतपणा ओथंबून दिसतो. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधींची संदीप गावडे यांना नेहमीच साथ लाभली…

Read More
You cannot copy content of this page