डिकवल येथे शेपटी रोगाने गुरांचा मृत्यू …!
⚡मालवण ता.०८-:मालवण तालुक्यातील डिकवल येथे गेल्या आठ दिवसात शेपटी रोग (बोटूलिझम) या आजाराने गुरांचा मृत्यू झाला आहे. गुरे दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डिकवल तेलीवाडी येथील शेतकरी सुभाष पांडुरंग तेली यांची सुमारे एक लाख रुपये किमतीची गुरे शेपटी रोगाने दगावली. गेल्या आठ दिवसांत या परिसरात शेपटी रोग (बोटूलिझम) या आजाराने येथील गुरांना प्रादुर्भाव झाला…
