Headlines

सर्वसामान्य जनतेचा मला पाठिंबा मिळाला तर माझा विजय निश्चित…

विशाल परब: सावंतवाडी शहरात केला प्रचाराचा शुभारंभ..

⚡सावंतवाडी ता.०८-: सर्वसामान्य जनतेचा मला पाठिंबा मिळाला तर माझा विजय निश्चित होईल असा विश्वास युवा नेते तथा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान मी लोकांच्या रोजगार आरोग्याच्या असलेल्या विषयामुळे या निवडणुकीच्या मैदान उतरलोय आणि नक्कीच मी निवडून आल्यावर ते प्रश्न प्रामुख्याने सोडवणार आहे असा शब्दही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. सावंतवाडी शहरात आज अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा प्रचाराचा शुभारंभ शहरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आणि गणेश मंदिर येथे जाऊन दर्शन घेऊन मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

ते पुढे म्हणाले मी आज निवडणुकीच्या मैदानात असलो तरी मी कोणावर टीका टिपणी करत नाही मी सर्व पक्षीय नेत्यांचे आदर करतो माझ्यावर जरी कोण टीका करत असले तरी मी त्यावर नो कॉमेंट्स करतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर आज अनेक नेत्यांच्या प्रचाराला स्टार प्रचारक जरी येत असले तरी माझे स्टार प्रचारक हे सर्वसामान्य जनताच आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page