श्री कालिकादेवी मंदिर, हडी येथे १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव…
मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील हडी येथील श्री कालिकादेवी मंदिर येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव शुक्रवार दि १५ नोव्हेंबर २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठया दिमाखात साजरा होणार आहे. यानिमित्ताने दि १५ नोव्हेंबर रोजीसकाळी ६ वाजता देवीच्या मंगल स्नानाने कार्यक्रमाची सुरवात होणार असून सकाळी ७ वाजता देवीला सुवासिक फुलांची मनमोहक आरस तर सकाळी ८. ३० वाजता महाआरती…
