स्वयंभू मंदिरात आमदार नितेश राणे यांनी घेतले दर्शन:आमदार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार..
कणकवली : महायुतीचे धडाडीचे उमेदवार भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कणकवली शहरात ग्रामदैवत स्वयंभू च्या दर्शनाने करण्यात आला. आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहराचे ग्रामदैवत स्वयंभूचे दर्शन घेत आपल्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ केला. कणकवली शहरात प्रभाग निहाय हा प्रचार करण्यात येणार असून आमदार नितेश राणेंच्या या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी कणकवली च्या मंदिराच्या देवस्थानचे मानकरी सदानंद राणे (जाणते), भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मे, कणकवली भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक अभय राणे, कीशोर राणे, माजी उपनगराध्यक्ष बंडु हर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अबिद नाईक, माजी नगरसेवक अभि मुसळे, चारूत्त साटम, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, सागर राणे, सखाराम राणे, गौतम गुडकर, अॅड. विराज भोसले, प्रथमेश राणे, पंकज पेडणेकर, मिथुन ठाणेकर, ओंकार राणे सिद्धेश वालावलकर, औदुंबर राणे, प्रवीण पाटील, महेश सावंत, विजय राणे, जोगी राणे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार कणकवली शहर भाजपच्या वतीने करण्यात आला.
