महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्धार: प्रचाराची आखली गेली जोरदार रणनीती..
⚡सावंतवाडी ता.०७-: प्रभाग पाच मधून जास्तीत जास्त मताधिक्य महायुतीला कसे मिळेल ? यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करून प्रयत्न करावे, असा निर्धार आज येथे बैठकीत करण्यात आला आहे. यावेळी बैठकीत प्रचाराची रणनीती आखली असून महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा जोरदार झंजावत सुरू करण्यात आला आहे. यावेळी ‘दीपकभाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणा देखील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.
यावेळी महायुतीचे मंदार नार्वेकर, सुधीर आडीवरेकर, अँड. संजू शिरोडकर, संतोष गांवस, देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, परिक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, अनिकेत पाटणकर, गणेश कुडव, नागेश जगताप, गुरुप्रसाद चिटणीस, परेश बांदेकर, वर्धन पोकळे, प्रथमेश प्रभू, संकल्प धारगळकर, मंथन जाधव आदी उपस्थित होते.
