मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील हडी येथील श्री कालिकादेवी मंदिर येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव शुक्रवार दि १५ नोव्हेंबर २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठया दिमाखात साजरा होणार आहे.
यानिमित्ताने दि १५ नोव्हेंबर रोजी
सकाळी ६ वाजता देवीच्या मंगल स्नानाने कार्यक्रमाची सुरवात होणार असून सकाळी ७ वाजता देवीला सुवासिक फुलांची मनमोहक आरस तर सकाळी ८. ३० वाजता महाआरती होणार आहे
तसेच सकाळी. ९ वाजता ओटी भरण्यास प्रारभ व नवसाची पूर्तता, सकाळी ११ वाजता गावराठीचे श्री कालिका मंदिर मध्ये वाजत गाजत आगमन होणार आहे तर हडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांच्यावतीने २०२५ सालच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा होणार आहे
या कार्यक्रमात रात्रौ ७ वाजता भव्य दिव्य असा दीपोत्सव होणार असून सायंकाळी. ७. ३० ते १० वा. महाप्रसादाचे वाटप होणार आहे तसेच रात्रौ १० वाजता गडगेवाडी सेवा मंडळ हडी यांचे सुस्वर भजन,
रात्रौ. ११. वा. पुरोहिता कडून पोथी ( भगवतगीता ) वाचन व बारापाच मानक- यांच्चा हस्ते गणेश पूजन
आणि रात्रौ १२. वाजता गावराठी व पालखी प्रदक्षिणा सोहळा या मध्ये मुख्य आकर्षण श्री देव गावडेपुरुष भेट रात्रौ १२ वाजता होणार आहे तरी या उत्सवास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे
