मंत्री दिपक केसरकर:सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा उद्या होणाऱ्या जनता दरबाराला मला निमंत्रण नाही..
⚡सावंतवाडी ता.१३-: चौकूळ येथील जमीन प्रश्न संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीला गाववासीयांनी उद्या उपस्थित राहणे आवश्यक आहे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे हे मी तुम्हाला निमंत्रण देत असून गाववासियाने विमानाने बैठकीला यावे विमानाचे तिकीट काढून दिली जातील असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
जनता दरबार घेण्यात येत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या जनता दरबाराबाबत मला का निमंत्रण नाही मला निमंत्रण द्यायला हवे होते असेही त्यांनी स्पष्ट केले खरंतर गाव वासियांच्या मागणीनुसारच मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर बैठक बोलावली आहे त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तरी पण हे गावचे माझे अत्यंत जवळचे आहेत त्यामुळे मी त्यांना आता निमंत्रण देत आहे त्यांनी अवश्य या बैठकीला यावे जर त्यांना यायला जमत नसेल तर त्यांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थित रहावे ही बैठक अत्यंत महत्त्वाचे आहे असे केसरकर म्हणाले.
