कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघात शिव सर्वेक्षण अभियन अंतर्गत कणकवलीत विजय भवन येथे विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारा संदर्भात शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी वन टू वन चर्चा केली.
कणकवली वैभववाडी देवगड मतदार संघात जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमूख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आदि नावे आघाडीवर आहेत. माञ या शिव सर्वेक्षण अभियानामध्ये उमेदवारांची भाऊ गर्दी पाहायला मिळत होती.
आज पार पडलेल्या शिव सर्वेक्षण अभियानामध्ये कणकवली विजय भवन येथे देवगड वैभववाडी कणकवली या तालुक्यांच्या शिवसेना पदाधिकारी विभागप्रमुख शाखाप्रमुख यांच्याशी वन टू वन, चर्चा करून मतदार संघाचा आढावा घेतला उपस्थित देवगड ,वैभववाडी, मतदारसंघात उ.बा.ठा. पक्षाचा उमेदवार कोण याबाबत कार्यकर्त्यांना मध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
