कणकवली : जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात. तसेच देशभक्तीची भावना कायम राहावी. या अनुषंगाने कणकवली शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. नगरपंचायतीच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यात नगरपंचायत अधिकाऱ्यांसह प्रतिष्ठीत नागरिक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयातून या फेरीला प्रारंभ झाला. तेथून बाजारपेठ मार्गे रेल्वे स्थानक आणि त्यानंतर पुन्हा नगरपंचायत कार्यालयापर्यंत ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये प्रांताधिकारी जगदीश कातकर, मु्ख्याधिकारी परितोष कंकाळ, नगरपंचायतीचे ब्रँड अॅम्बेसिडर दीपक बेलवलकर यांच्यासह रोटरी क्लब, विविध बचतगट आणि इतर संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कणकवली नगरपंचायत कार्यालया समोर तिरंगा कॅनव्हास तयार करण्यात आला आहे. त्यावर नागरीकांनी स्वाक्षरी व घोषवाक्ये नोंदवावीत. नागरीकांनी आपल्या घरावरील राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून किंवा कणकवली नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी सेल्फी पॉंईट तयार करण्यात आलेला असून याठिकाणी फोटो काढून harghartiranga.com या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावा. ‘’घरोघरी तिरंगा’’ या उपक्रमामध्ये कणकवली शहरातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने तिरंगा यात्रा…
