गुरु कल्याणकर यांचे 15 ऑगस्टचे आंदोलन मागे …

डिसेंबर महिन्यात मंजूर कामे पूर्ण करण्याचे मिळाले लेखी पत्र.

⚡बांदा ता.१३-: बांदा शहरासाठी मंजूर झालेल्या १ कोटी ८० लाखांच्या विकासकामांना कार्यरंभ आदेश देऊन डिसेंबर महिन्यात कामे प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिल्याने १५ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांनी पुकारलेले बेमुदत उपोषण मागे घेतले.

कनिष्ठ अभियंता विजय चव्हाण यांनी बांदा ग्रामपंचायत कार्यालयात लेखी पत्र श्री कल्याणकर यांना दिले. मात्र कामास सुरुवात न केल्यास २६ जानेवारी २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा श्री कल्याणकर यांनी यावेळी दिला.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, सौ. तनुजा वराडकर, सौ. लक्ष्मी सावंत, निलेश उर्फ पापू कदम, हेमंत दाभोलकर, व्यंकटेश ऊरूमकर, शैलेश केसरकर, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख रियाज खान आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page