कृती समिती सदस्य आनंद गावडे यांचा सल्ला..
⚡सावंतवाडी ता.१३-: चौकुळ कबुलायतदार गांवकर प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमची बैठक आहे. त्या नियोजन बैठकीला सोमनाथ गावडे उपस्थित नव्हते. त्यांना मुद्दे माहिती नसतील तर कोणत्याही प्रकारची विधान करू नयेत. या जमिनीप्रश्नी अधिकृत समिती मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे उपोषणाची दिशा भरकटवू नये. चुकीची विधान करू नये असा पलटवार चौकुळ कबुलायतदार गांवकर कृती समितीचे सदस्य आनंद गावडे यांनी हाणला. यावेळी गावचे प्रमुख सुभाष गावडे, दिनेश गावडे यांच्यासह गावचे प्रमुख मंडळी मुंबईला उद्या उपस्थित राहणार असून यावेळी पूर्ण गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
