कास्ट कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता १३
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण,तसेच जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा . या मागणी साठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, शाखा सिंधुदुर्ग यांचे वतीने निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले आहेत . या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग कडील ७ मे, २०२१ च्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचा-यांना पदोन्नती पासून वंचित ठेवले आहे. भारतीय संविधानातील तरतुदी नुसार अनुसूचित जाती,अनुसूचितजमाती सह इतर मागासवर्गीय कर्मचा-यांना पदोन्नती ,सरळसेवा भरती मध्ये दिलेल्या सवलतीस अनुसरुन मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची व मार्गदर्शनाची केंद्र सरकारने अंमलबजावणी करुन देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिव यांना १५ जुन, २०१८ रोजीच्या परिपत्रकाव्दारे कळविले की अनुसूचित जाती ,अनुसूचित जमातीच्या कर्मचा-यांच्या पदोन्नत्या रोखता येणार नाहीत, परंतू असे स्पष्ट निर्देश देवूनही महाराष्ट्र शासनाने अद्यापही मागसवगीयांच्या पदोन्नती बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. कर्नाटक राज्य शासनाने त्याच धर्तीवर मागासवर्गीय कर्मचारी यांना पदोन्नत्या दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी हे त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहीले आहेत. त्यामुळे शासनाप्रती त्यांच्या मनात असंतोष निर्माण झालेला आहे. तसेच जुनी पेन्शन योजना इतर राज्याप्रमाणे लागू करावी. पदोन्नतीप्रमाणे सरळसेवेतही मागासवर्गीयांच्या अनुशेषाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत सदरची पदे प्राधान्याने भरण्यात यावीत .आदि प्रश्नाबाबत सिंधुदुर्ग जिल्हयाचे वतीने निवेदन सादर करण्यात आले . या प्रश्नाबाबत तात्काळ निर्णय घेऊन न्याय देणेत यावा अन्यथा मा. कृष्णा इंगळे, अध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, यांचे नेतृत्वाखाली” आजाद मैदान मुंबई” येथे आंदोलन करणेत येईल असा इशारा या आंदोलनाच्या माद्यमातून देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page