जिल्हा बँकेच्या सखी बँक योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा…

मनीष दळवी:आज झाला शुभारंभ..

ओरोस ता १३
भविष्यात येणार काळ हा जिल्ह्यातील महिलांचा सुवर्णकाळ असणार आहे. त्यासाठी जिल्हा बँक सदैव महिलांच्या पाठीशी राहणार आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जातील. महिलांनी व्यवसाय करण्यासाठी पुढे यावे. त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा, अनुदान, प्रशिक्षण, विक्री व्यवस्था जिल्ह्यातच निर्माण करून देऊ. चालू वर्षी महिलांसाठी ३० कोटीची तरतूद केली आहे. भविष्यात १०० कोटींची तरतूद करू असे आश्वासन देतानाच जिल्ह्यातील महिलांनी बँकेच्या बँक सखी योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाचे आणि जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज बँक सखी उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बँक सखी योजनेचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय संयुक्त सचिव वर्षा पवार-तावडे, कोल्हापूरच्या स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा कांचन परुळेकर, आ नितेश राणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, नाबार्डच्या जिल्हाप्रमुख दीपा माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर, बँकेचे संचालक निता राणे, गजानन गावडे, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, विद्याधर परब, प्रकाश बोडस, समीर सावंत, रवींद्र मडगावकर, श्वेता कोरगावकर, सरोज परब, मेघा गांगण, प्रज्ञा परब आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील बचतगट महिला प्रतिनिधी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page