तब्बल ७५० दाखल:४११ तक्रारींना दिले टोकण:पालकमंत्री चव्हाण यांची माहिती..
ओरोस ता.१३-:
आज झालेल्या कुडाळ – मालवण मतदार संघाच्या जनता दरबारात तब्बल ७५० तक्रारी आल्या आहेत. यातील ३५९ तक्रारींवर आज चर्चा झाली असून उर्वरित ४११ तक्रारदारांना केवळ टोकण नबर देण्यात आला आहे. त्यावर मागाहून चर्चा करण्यात येणार आहे. चर्चा झालेल्या ३५९ पैकी २८६ तक्रारी सुटल्या असून ७३ तक्रारींचे निराकरण झालेले नाही, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील जनतेच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी विधानसभा निहाय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुरू केलेल्या जनता दरबारात तक्रारींची संख्या वाढती राहिली आहे. काल झालेल्या कणकवली विधानसभेत केवळ ९६ तक्रारी आलेल्या असताना आज कुडाळ-मालवण मतदार संघात तक्रारींचा अक्षरशा पाऊस पडला आहे. आजचा जनता दरबार संपल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उप वनरक्षक नवल किशोर रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
