सोमनाथ गावडे:मुख्यमंत्र्यांसोबत उद्या होणाऱ्या बैठकीला कबुलायतदार गावकर कृती समितीचा पूर्णपणे बहिष्कार…
⚡सावंतवाडी ता.१३-: चौकुळ गावच्या कबुलायतदार प्रश्नावर गावातील युवा पिढीला हाताशी धरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर गावामध्ये तेढ निर्माण करत आहे केवळ निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावणे स्टंटबाजी असून या बैठकीला कबुलायतदार गावकर कृती समितीचा पूर्णपणे बहिष्कार आहे त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या उपोषणावर ग्रामस्थ ठाम असल्याची माहिती चौकूळ कबुलायतदार कृती समितीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गावडे यांनी दिली.
तर पंधरा वर्षे सत्तेत असूनही चौकुळ जमीन प्रश्नावर मंत्री दीपक केसरकर यांनी ठोस असा निर्णय घेतला नाही त्यामुळे ते जेवढे या विषयापासून बाजूला राहतील तेवढे चौकूळ गावाला फायदेशीर ठरेल असा टोलाही श्री गावडे यांनी लगावला.
श्री गावडे यांनी येथील शासकीय पर्णकृती विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा एडवोकेट संग्राम गावडे उपस्थित होते ते म्हणाले 10 मे 1999 ला रातोरात चौकुळ गावची कबलायतदार जमीन हा सातबारा महाराष्ट्र शासनाच्या नावे केला गेला हे करताना कुठल्याही प्रकारे न्यायालयीन तसेच कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन घेतले गेले नाही. ग्रामस्थांनी सुरू केलेल्या लढ्यानंतर ही जमीन भोगवटदार नंबर एक म्हणजेच कबुलायतदार यांच्याच मालकीची आहे असे स्थानिक महसुली अधिकाऱ्यांनी वेळोवेळी महाराष्ट्र शासनाला कळवणे मात्र आजपर्यंत या विषयाबाबत काहीच तोडगा निघालेला नाही आज निवडणुकीच्या तोंडावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत ग्रामस्थांची बैठक मुंबई येथे आयोजित केली आहे परंतु बैठक म्हणजे एक प्रकारे स्टंटबाजी आहे मुळात तब्बल पंधरा वर्षे सत्तेत असताना मंत्री केसरकर यांनी चौकुळ संदर्भात कुठलाही ठाम निर्णय घेतला नाही. ज्यांना कबुलायतदार जमीन प्रश्नाबद्दल काही माहिती नाही अशा गावातील तरुण मुलांना हाताशी धरून गावामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहे. त्यामुळे त्यांनी चौकुळ जमीन प्रश्न शक्य तेवढे बाजूला राहावे ते बाजूला राहतील तितका या प्रश्ना बाबत गावाला फायदा होणार आहे.
श्री गावडे पुढे म्हणाले मुंबईमध्ये आयोजित केलेल्या बैठकीला कबुलायतदार कृती समितीला कुठल्याही प्रकारचे लेखी किंवा तोंडी आमंत्रण दिले गेले नाही ते कोण या बैठकीला जाणार आहेत त्यांना जमीन प्रश्नाबाबत कुठल्याही प्रकारचे ज्ञान नाही. याबाबत आज गावात बैठक पार पडली या बैठकीमध्ये जोपर्यंत महाराष्ट्र शासन रद्द होऊन कबुलायतदार गावकर असा सातबारा मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ बेमुदत उपोषणावर ठाम आहेत येत्या 15 ऑगस्टला ग्रामपंचायत चौकुळ येथे कृती समितीच्या माध्यमातून उपोषण छेडण्यात येणार आहे या उपोषणाला समस्त ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. पार पडलेल्या बैठकीला डॉक्टर राजेंद्र गावडे एडवोकेट राजाराम गावडे सोमनाथ गावडे पांडुरंग गावडे आधी प्रमुख ग्रामस्थ तसेच कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
