तारकर्ली येथील तरुण बेपत्ता…

⚡मालवण ता.१३-: मालवण तालुक्यातील तारकर्ली मधली वाडी येथील दुर्वेश लक्ष्मण धुरी (वय २५) हा दि. ११ ऑगस्ट पासून तरुण बेपत्ता झाला आहे. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात खबर देण्यात देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तारकर्ली मधली वाडी येथील दुर्वेश लक्ष्मण धुरी हा दि. ११ ऑगस्ट सकाळी ७ वाजल्यापासून बेपत्ता आहे. दुर्वेश हा आपण बाहेर जातो, असे आईला सांगून निघाला होता. मात्र त्यानंतर तो घरी आलाच नाही. शोधाशोध करूनही तो सापडून आला नाही. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजी त्याची आई दिव्या लक्ष्मण धुरी (वय ५० वर्ष) यांनी मालवण पोलीस स्थानकात दुर्वेश हा बेपत्ता असल्याची खबर दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखली डी.व्ही. जानकर करत आहेत.

You cannot copy content of this page