माणगाव येथील तरुणाचा आडेली येथे आढळला मृतदेह…

घातपात की आत्महत्या : ग्रामस्थांमध्ये चर्चा..

वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथे नर्सरीत कुडाळ तालुक्यातील माणगाव तळीवाडी येथील तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत घातपात की आत्महत्या अशी उलट सुलट चर्चा गावात सुरू असून घटनास्थळी मोठ्या पोलीस बंदोबस्त आहे.
माणगाव येथील वसंत प्रभाकर भगे (वय ३२) असे त्या मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान शॉक लागून मृत्य झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी वेंगुर्ला पोलीस दाखल झाले असून या ठिकाणी फॉरेन्सिक टीम ला पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून वसंत भगे आडेली पेडणेकरवाडी येथे आपल्या सासरवाडीला आला होता.

You cannot copy content of this page