बबन साळगावकर यांचा नगरपालिका प्रशासनाला इशारा: कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी थकविणाऱ्या तात्कालीन ठेकेदारावर कारवाई करा..
⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडीतील समस्या दहा दिवसात मार्गी लावा तसेच रस्त्याची झालेली दुरावस्था महिन्याभरात पूर्ण करा, अन्यथा गाठ माझ्याशी असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज इथे दिला.
दरम्यान प्रशासन नगरपालिकेवर लादल्यापासून सावंतवाडी शहराची वाताहत झाली आहे, हे पाहून मनाला खूप वेदना होते त्यामुळे प्रशासनाने लोकांचा अंत पाहू नये चतुर्थी पूर्वी हे समस्या मार्गी न लागल्यास रस्त्यावर उतरून आमचा हिसका तुम्हाला दाखवू असा इशारा देखील श्री साळगावकर यांनी यावेळी य नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. श्री साळगावकर यांनी आज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत शहरातील समस्यांबाबत लक्षवेधून जाब विचारण्यात आला.
ते. पुढे म्हणाले नगरपरिषदेत यापूर्वी कंट्रकटी पद्धतीने काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी तात्कालीन ठेकेदाराने दिला नाही.त्यामुळे येत्या महिन्याभराच्या आत त्या ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
