बांदा/प्रतिनिधी
श्री श्री १०८ महंत मठाधीष प.पू. सद्गुरू श्री गावडे काका महाराज यानी संस्थापीत केलेल्या श्री सदगुरु भक्त सेवा न्यास या सामाजीक संस्थेच्या ११ नवनिर्वाचीत विश्वस्थांची २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी न्यास निर्माते श्री गावडे काका महाराज यानी निवड केली. यामध्ये अध्यक्षपदी राकेश केसरकर, सचीव विजय साईल, खजीनदार चंद्रकांत उर्फ गौरव मुंज, सिंधुदूर्ग विभाग व कार्याध्यक्ष देविदास रेडकर, मुंबई विभाग प्रमुख सौ. रश्मी डिचोलकर, मनीष नाईक (योगा प्रमुख), सुजय गावडे, सोनू उर्फ सचीन धावडे, साईप्रसाद पेडणेकर, सौ. प्रिती कुशे, सौ. केसर वानिवडेकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी गावडे काका महाराज आपल्या मार्गदर्शनात बोलताना म्हणाले कि, हि सामाजिक संस्था गेल्या ९ वर्षापासुन सामाजिक बांधिलकीची कामे करत आहे. आपण सर्वानी समाजतील तळागाळापर्यंत संस्थेच्या योजना पोहचवून लाभ देण्याचा प्रयत्न करा. यावर्षी या संस्थेच्या योग शिक्षकांच्या माध्यमातून रोगानुसार योग ही संकल्पना राबवायची आहे. या योजनेतून समाजातील लोकांना योगा नुसार आजार दुर करून निरोगी आरोग्य कस जगता येईल याचे महत्व पटवून त्याना सेवा द्या. सर्वानी संस्थेच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करा.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री केसरकर म्हणाले कि, सर्वात प्रथम सदगुरूनी या सेवेसाठी आम्हा सर्वाना योग्य समजले हे आमच भाग्य आहे. संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आम्ही सर्व प्रामाणिक प्रयत्न करणारे व महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारत देशामध्ये संस्थेचे व सद्गुरूंचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करणार.
फोटो :-
माड्याचीवाडी येथे सद्गुरू भक्त सेवा न्यासाचे विश्वस्त श्री सद्गुरू गावडे काका महाराज यांच्यासोबत अध्यक्ष राकेश केसरकर, सचिव विजय साईल व इतर.
बांदा येथील श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास अध्यक्षपदी राकेश केसरकर यांची निवड…
