कातकरी समाज बांधवांच्या घराचा प्रश्न पालकमंत्र्यांनी सोडविला…

सिंधुदुर्ग दि १२ (जिमाका) जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. वारंवार पाठपुरावा करुन तसेच निवेदन देऊनही घरकुलाच्या प्रश्नाची दखल घेतल्या जात नव्हती.

        परंतु आज झालेल्या 'जनता दरबार' मध्ये हा प्रश्न मार्गी लागला ते पालकमंत्र्यांच्या स्वभावात असणाऱ्या मानवतेमुळे.  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून सुमारे ७० कातकरी समाज  बांधवांना घरासाठी ओसरगांव येथील  जमीन देऊन त्यांच्या घराचा प्रश्न कायमचा सोडवला. या निर्णयामुळे कातकरी समाज बांधव आनंदी होऊन त्यांनी जनता दरबारामध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे मनापासून आभार मानले.

०००००००

You cannot copy content of this page