रु.१,११,१११ चे मिळणार विजेत्या संघाला बक्षीस..
⚡कणकवली ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांची दही हंडी २७ ऑगस्ट रोजी कासार्डे येथे पटांगणावर भव्य स्वरूपात होणार आहे.या कार्यक्रम प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायणराव राणे, सार्व.बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण , भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदी नेत्यांसह भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार व दोन्ही जिल्हयातील विविध भाजपचे मान्यवर नेते पदाधिकारी – कार्यकर्ते व गाव मानकऱ्यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.
या वेळी १,११,१११ रकमेच्या बक्षीस ठेवण्यात आले आहे. या मंडळाचे हे नॉनस्टॉप १२ वे वर्ष असून यावेळी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांना सहभागी होता येईल.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यातील गोविंदा पथकांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आठ थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख रु १ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक कोकण दूध चषक देण्यात येणार आहे.तर यावेळी चार थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख २ हजार २२२ रुपये, पाच थरांची सलामी देणाऱ्यासाठी ३ हजार ३३३ रुपये,सहा थरांची सलामी देणाऱ्यासाठी ४ हजार ४४४ रुपये,सात थरांची सलामी देणाऱ्यासाठी ५ हजार ५५५ रुपये व प्रत्येकी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.यावेळी डी जे , ढोलपथकांच्या गजरासह दुपारी २.३० वा. गावातील स्थानिक प्रतिष्ठीत मानकरी व पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या हस्ते दहीहंडीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे
शाभगी होणाऱ्या संघांनी नावनोंदणीसाठी प्रमोद जठार मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव मोबा ९४०३२८९००५ अथवा श्री रोहित महाडीक भाजप कार्यालय कासार्डे ७०६६९३१०५३ येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
