वेत्ये येथील गणेश सामंत, यांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस संगीत साहित्य भेट…

सावंतवाडी : सहदेव राऊळ : वेत्ये येथील गणेश लक्ष्मण सामंत यांच्यावतीने त्यांच्या भरीव देणगीतून मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस एकूण २८ हजार रुपयांचे संगीत साहित्य भेट देण्यात आले. तुळशीदास नाईक यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे मुलांना हे संगीत साहित्य उपलब्ध करून मिळाले.


या साहित्यात हार्मोनियम, तबला, टाळ, झांज, बासुरी, खंजिरी, ढोल, साईड ड्रम आदी संगीत साहित्यासोबत त्याला लागणाऱ्या इतर साहित्याचा समावेश आहे. आसोलकर सर यांनी स्वतः जाऊन या सर्व संगीत साहित्याची निवड केली. तसेच संगीत साहित्य वाजवणे व हाताळणे याविषयी शाळेतील मुलांना आपले मार्गदर्शन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन नूतन अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, तुळशीदास नार्वेकर, असोलकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, वर्षा गवस व विद्यार्थी उपस्थित होते. या दातृत्वाबद्दल श्री सामंत यांचे शाळेच्यावतीने शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सूर्वे, शाळा व्यवस्थापन माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर व सर्व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page