नगरपरिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे…

मंगळवारी देणार नगरपालिकेवर धडक देऊन विचारण्यात जाब:माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा..

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी शहर नगरपरिषद एक सुंदर स्वच्छ कारभाराची नगरपरिषद म्हणून ओळख होती.परतु आज या नगरपरिषदेचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या हातात गेला आहे. नगरपरिष हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. आणि ते खाल्लंच पाहिजे अशा अविर्भावामध्ये नगर परिषदेचा कारभार सुरू आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला.

ते पुढे म्हणाले की दोन महिन्यापूर्वी घाई गडबडीने केलेली रस्ते सगळेच्या सगळे उकडून गेले आहेत येथे अपघात झाले अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले शहरातील सर्व पानंदी निसरड्या झाल्या असून अनेक लोक पडतात कुणाचं लक्ष नाही सार्वजनिक शौचालयाची अवस्था भयानक आहे. चौकाचौकात रस्त्या रस्त्यावरती कचरा साठलेला आहे.सर्वत्र डासांची फैलाव झालेला आहे. मच्छी मार्केट अस्वच्छस्त रस्त्याच्या साईटची निसरड्या झाल्यात. लोक पडत आहेत सार्वजनिक स्ट्रीट लाईट बऱ्याच ठिकाणी बंद असतात गार्डन स्मशानभूमी अस्वच्छता तसेच भष्टकारभाराचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी सावंतवाडीच्या मुख्याधिकारी यांना घेराव घालत जाब विचारण्यात येणार आहे असे श्री साळगावकर यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page