⚡बांदा ता.११: बांदा शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व तसेच ज्येष्ठ दशावतारी कलावंत शांताराम उर्फ बाळा आकेरकर यांना धारगळ गोवा येथील संकेत पाडलोस्कर मित्रमंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
श्री आकेरकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आषाढी महोत्सवच्या निमित्ताने ते अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देतात. त्यांच्या या समाजशील उपक्रमामुळे त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संकेत पाडलोस्कर, श्री भाईप, तसेच बांदा उपसरपंच बाळू सावंत, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, साईबाबा मठाचे विश्वस्त राकेश केसरकर, प्रवीण नार्वेकर, प्रवीण गाड, विजेंद्र बांदेकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, अजय परब, पत्रकार अजित दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री आकेरकर यांनी आभार व्यक्त करत हा सन्मान माझा नसून माझ्या बांदावासियांचा असल्याचे सांगितले.
बाळा आकेरकर यांचा संकेत पाडलोस्कर मित्रमंडळाच्या वतीने सन्मान…
