बांद्यात उद्या महारक्तदान शिबिराच आयोजन…

बांदा/प्रतिनिधी
‘बांद्याचा बाप्पा’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने येथे रविवार दिनांक ११ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाने या आधी सलग चार वर्षे उत्स्फुर्त सहभागाने रक्तदान शिबिर यशस्वी केले असून यंदाचे आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, व्यापारी ग्रामस्थ, महिला शेकडोच्या संख्येने या शिबिरात सहभागी होतात. ११ रोजी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय बांदा येथे सकाळी ९. ३० ते दुपारी १ या वेळेत हे शिबीर होणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून शिबीर यशस्वी करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर व शिबीर प्रमुख अक्षय मयेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page