माझी लाडकी बहिण योजना राबवून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट केल्याबद्दल धन्यवाद..
देवगड प्रतिनिधी
माझी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट केल्याबद्दल आभार आणि धन्यवाद प्रकट करण्यासाठी सिंधू संजीवन संस्था देवगड संचलित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक देवगड यांच्यामार्फत एक राखी लाडक्या भावासाठी या उपक्रमा अंतर्गत देवगड तालुक्यातून जास्तीत जास्त राख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना पाठविण्याचा आमच्या मानस आहे देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन सिंधू संजीवन संस्था संचलित तेजस्वी महिला ढोल ताशा पथकाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दीपिका मुणगेकर, प्रज्योत राणे, सोनाली गावकर, समता राणे ,रूपाली खानविलकर यांच्याशी संपर्क साधावा.
