१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त शेठ म.ग हायस्कूल देवगड येथे चित्रकला स्पर्धा…

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडने केले आयोजन..

देवगड (प्रतिनिधी) १०ऑगस्ट २०२४

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड तर्फे स्वातंत्र्यदिना निमित्त दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी शेठ म. ग. हायस्कूल देवगड सकाळी १० ते १२:३० या वेळेत येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा चार गटात घेण्यात येणार असून प्रत्येक गटाला वेगळे विषय दिले जाणार आहेत.


यामध्ये पहिला गट १ ते ४ पर्यंत असून यासाठी विषय
कौलारू घर आणि नारळाची बाग हा आहे.या गटासाठी वस्तूरुपी तीन बक्षीस देण्यात येणार आहे.
दुसरा गट ५ ते ७ वी पर्यंत असून यासाठी विषय पावसाळ्यातील भातलावणी हा आहे.या गटासाठी
प्रथम ७०० द्वितीय ५०० तृतीय ३०० अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. तिसरा गट ८ ते १० पर्यंत असून
यासाठी विषय कोकणातील गणेशोत्सव हा आहे.या गटासाठी प्रथम १००० द्वितीय ७०० तृतीय ५०० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर खुल्या गटासाठी कोकणी लोककला हा विषय आहे.या गटासाठी यासाठी प्रथम १५०० द्वितीय १००० व तृतीय ७०० अशी बक्षिसे देण्यात येणार आहे.तरी या स्पर्धेतील जास्तीत जास्त मुलांनी आपला सहभाग नोंदविण्यासाठी मनस्वी घारे ,दयानंद पाटील, अनिल गांधी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page