आंबोलीत वनखात्याच्या जमिनीत बंगले बांधून विकण्याची परवानगी द्या…

आंबोली,ता.१०:येथील वन खात्याच्या राखीव जंगल आणि खाजगी वने च्या जागेत बंगले बांधून बाहेरच्या लोकांना विक्री करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी पालकमंत्र्याकडे जनता दरबारात समाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे.आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरा,विज उपकेंद्र सुरु करा,बंगलेवाडी येथील साकवाच्या जागी पुलासाठी निधी मंजूर करा अशी मागणी केली आहे. आंबोली वन विभागाच्या राखीव आणि खाजगी जागेत 2 बंगले बांधून विकण्याची परवानगी द्या. याठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून दलालांनी जमिनीचे व्यवहार केल्यामुळे अतिक्रमने वाढली आहेत.वन कायदा फक्त सर्व सामान्य लोकांना दाखवला जातो मग धन दांडग्यांचे अल्पावधीत इमारती उभ्या राहतात त्यावेळी वन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही. वन कायद्यानुसार अतिक्रमन होण्यासाठी जबाबदार धरून अधिकाऱ्यांवर आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा कायदा असताना अद्याप पर्यंत कारवाई का झाली नाही.ग्रामस्थांनी वन विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्याकडे तसेच मुख्यमंत्री आणि सचिव यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे. वन खाते हतबल असेल तर वन जमिनी संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा. खाजगी वने जमीन जर अशा पद्धतीने व्यवहार होत असेल तर वन खात्याने ग्रामस्थांना वाटण्यासाठी जमीन द्यावी. वन विभागाचे कायदे फक्त गरीब आणि सर्व सामान्य लोकांनाच का? मूळ भूमिपुत्रांवरच अन्याय का? त्यामुळे आपल्याला देखील वन खात्याच्या जमिनीत 2 बंगले बांधून बाहेरच्या लोकांना विकण्याची परवानगी द्या अशी मागणी केली आहे.वन खात्याच्या सचिवांकडे देखील ग्रामस्थांनी तशी मागणी केली आहे. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई,परिचर,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,औषध निर्माता ही पडे तात्काळ भरा.आरोग्य यंत्रणेवर परिणाम होत आहे. ग्रामस्थांना तेथे ताटकळत राहावे लागते. अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केला आहे. विज उपकेंद्र कार्यकारी अभियंता यांनी मंजूर करून देखील एक वर्ष होऊन सुरु होत नाही.एकच कर्मचारी एवढा भार सांभाळत आहे. याठिकाणी उपकेंद्र सुरु करावे. बांधकाम विभाग कडून बंगले वाडी येथील साकवाच्या ठिकाणी काँक्रीट चे पूल बांधावे. अशी मागणी पालकमंत्री यांच्या जनता दरबारात अनिल चव्हाण यांनी केली आहे.

You cannot copy content of this page