मैदानात फुटबॉल खेळण्यासाठी दिली परवानगी; काही नागरिकांकडून करण्यात आला होता विरोध..
⚡सावंतवाडी ता.१०-: येथील स्वरार हॉस्पिटल समोरील जिमखाना मैदानावर शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळण्यापासून काही नागरिकांनी रोखले होते. याबाबत त्यांनी तात्काळ संजू परब यांची भेट घेऊन लक्ष वेधले. दरम्यान संजू परब यांनी तात्काळ मुख्याधिकारी यांच्या कानावर गोष्ट घालून त्यांनी तात्काळ मुलांना ते ग्राउंड उपलब्ध करून दिले. त्यामुळे त्या मुलांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले.
