राष्ट्रस्तरीय वेशभूषा स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालयाचा नील बांदेकर भारतातून लहान गटात प्रथम…

बांदा/प्रतिनिधी
सोशल युनिटी फाउंडेशन, देहरादून आयोजित राष्ट्रस्तरीय वेशभूषा स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली प्रशालेत इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने संपूर्ण भारतातून लहान गटात प्रथम क्रमांक मिळविला.
हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती अशा विविध भाषातून हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये मराठी भाषेतून तानाजीची वेशभूषा साकारणाऱ्या नीलने भारतातून प्रथम येऊन कोकणचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे
यासाठी त्याला मार्गदर्शक म्हणून त्याचे आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीलने यापूर्वी देखील वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धेत जिल्हास्तर, राज्यस्तरावर अनेक पारितोषिके मिळविली आहेत.
फोटो :-
नील बांदेकर.

You cannot copy content of this page