१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार यादीत नाव नोंदविणे गरजेचे…

अँड.प्रदीप मिठबावकर:मालवण कट्टा येथे नव मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न..

⚡मालवण ता.०९-: भारतीय संविधानाने १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार यादीत आपले नाव नोंदविणे गरजेचे आहे. तसेच इतर नागरिकांनाही मतदार नोंदणी करण्यास प्रेरित केले पाहिजे, असे प्रतिपादन मालवण कट्टा येथील ऍड. प्रदीप मिठबावकर यांनी येथे बोलताना केले.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नव मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे, प्राचार्य डी. व्ही. मिराशी, उपप्राचार्य आर. जी. गावडे, संस्थेचे सचिव सुनील नाईक, मंडळ अधिकारी महादेव गवस, कट्टा गावचे तलाठी शिवगंगा जाधव , महसूल सहाय्यक करन मांजरेकर, पेंडूर उपसरपंच सुमित सावन्त, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे आदी व इतर उपस्थित होते

यावेळी नायब तहसीलदार नागेश शिंदे यांनी भारत हा लोकशाही देश असून ही लोकशाही बळकट करण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाने आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी श्री सुनील नाईक यांनी मतदार नोंदणीची आवश्यकता विशद केली यावेळी एकूण ४० नव मतदारांची नोंदणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस विभागाचे प्रमुख प्रा. मिलिंद कदम यांनी केले. तर आभार प्रा. वैशाली पालव यांनी मानले.

You cannot copy content of this page