खासदार नारायण राणें:रेल्वे स्थानके सुशोभिकरण कामाचे श्रेय पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह सर्व जनतेच..
कणकवली : सिंगापूरच्या धर्तीवर सिंधुदुर्ग किनारपट्टीचाही विकास करण्याला माझे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने सिंगापूर येथील अभियंत्यांना इथे आमंत्रित केले आहे. त्यांना किनारपट्टीलगतची जी जागा पसंत पडेल, तेथे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या जातील. कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाबरोबरच प्लॅटफॉर्मवर शेड होणे देखील अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्याकडून पाठवल्यास त्या प्रस्तावाला दिल्लीतून परवानगी दिली जाईल, असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले.
कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभिकरण कामाचे लोकार्पण खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वेचे सहसंचालक आर. के. हेगडे सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी आमदार राजन तेली, अॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, बंडू हर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा. नारायण राणे म्हणाले, रेल्वे स्थानके सुशोभिकरण कामाचे श्रेय पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह सर्व जनतेला आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर निवारा शेड उभी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंजूर करून आणण्याची जबाबदारी आपली आहे. विकास कामांसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आणि कोकणच्या विकासात योगदान द्यावे.
