कोकण रेल्वेने परवानगी दिल्यास प्लॅटफॉर्मवर शेड बांधणार-:ना. रविंद्र चव्हाण…

कणकवली : कोकण रेल्वे प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी आणि सावंतवाडी या चार स्थानकांच्या बाहेरील भागाच्या सुशोभिकरणाला परवानगी दिली आहे. जर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवर शेड बांधण्यासाठी परवानगी दिली तर एक वर्षभराच्या आत काम केलं जाईल. मुंबईतून प्रवासी इथल्या स्थानकात उतरल्यानंतर बाहेर कुठे जायचे. बस कुठे थांबणार याची माहिती होत नव्हती. स्थानकाबाहेर छप्पर नसल्याने पावसात प्रवाशांच्या छत्र्या उडून जात होत्या.

स्थानकातील रस्ते खड्डेमय होते. या सर्व सुविधांच्या निर्मितीसाठी रेल्वे प्रशासनाकडे निधी नाही. त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख १२ रेल्वे स्थानके सुशोभिकरणासाठी निश्चित केली.
यातील चार रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाला कोकण रेल्वे प्रशासनाने मंजूरी दिली.

रेल्वे प्रशासनाने फक्त स्थानकाच्या बाहेरील भागाच्या सुशोभिकरणाला आणि सुविधांच्या निर्मितीला परवानगी दिली आहे. जर रेल्वे प्रशासनाने अंतर्गत भागात सुविधांची परवानगी दिली तर प्रमुख स्थानकांवर छप्पर बांधून देण्याचीही आमची तयारी आहे, असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केले.

You cannot copy content of this page