…अखेर तो बॅनर प्रशासनाने हटविला

कणकवली : शहरातील रेल्वे स्थानकाच्या शुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळ्याची अंतिम तयारी सुरू असताना गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाबाहेर एका फलकावर रेल्वे स्थानकावरील महत्वाच्या कामांकडे लक्ष वेधण्यात आलेल्या एका वृत्तपत्रातील कात्रणाचा बॅनर करून खाली पक्षाचे चिन्ह लावण्यात आले होते. काही वेळ त्या बॅनर ची मोठी चर्चा देखिल सुरू होती. मात्र प्रशासनाने याची ताबडतोब दखल घेत तो बॅनर हटविला.

प्रांताधिकारी जगदीश कातकर व कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर ज्यांनी बॅनर लावला त्यांना याबाबत सूचना देण्यात आली. बॅनर काढा नाहीतर आम्ही काढतो असेही सांगण्यात आले.

मात्र त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. भाजपा कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिस प्रशासनाने तात्काळ नगरपंचायत प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बॅनर हटविण्यात आला.

दरम्यान यावेळी कणकवली पोलीस व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, समीर प्रभुगावकर, वागदे सरपंच संदिप सावंत, निखिल आचरेकर, सुभाष मालंडकर प्रज्वल वर्दम, प्रशांत राणे आदि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page