कणकवली रेल्वे स्थानकाचा उद्या लोकार्पण सोहळा…

ठाकरे गटाकडून पोस्टरबाजी ; वृत्तपत्रातील बातमीचा केला बॅनरकाही तास शिल्लक असताना हे लागलेले पोस्टर ठरतेय चर्चेचा विषय..

कणकवली : शहरातील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरणाचे काम सुरू होते. अनेक वेळा या कामावर अनेकांनी आरोप – प्रत्यारोप केले. मात्र होणाऱ्या आरोपांकडे दुर्लक्ष करत एकदा रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले. आणि आता काही तसच लोकार्पण सोहळ्यासाठी शिल्लक राहिले आहे. मात्र अस असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ( मशाल चिन्ह ) असलेला व एका वृत्तपत्रात स्थानकावरील महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यात आले होते.

त्याचे कात्रण काढून पोस्टर करून रेल्वे स्थानकाच्या बाहेर लावण्यात आले आहे. हा पोस्टर बॅनर आता चर्चेचा विषय ठरला असून कणकवलीत उद्या होणाऱ्या सुशोभीकरणाच्या लोकार्पण सोहळ्या वेळी वातावरण तापण्याची शक्य वर्तवली जात आहे.

You cannot copy content of this page