देवगड ( प्रतिनिधी ) ८ ऑगस्ट २०२४
प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्थेच्यावतीने श्रीराम मोरेश्वर माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे मध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य स्पर्धेत तालुकास्तरावर शेठ म.ग. हायस्कूल च्या ‘ Red Alert ‘ या विज्ञान नाट्यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.
या नाट्यामध्ये प्रशालेतील सम्यक महेश सकपाळ , अनुष्का प्रशांत पोकळे , प्रशिल सचिन जाधव , स्वरा सदाशिव भुजबळ , पल्लवी विद्याधर पेठे , हर्ष ध्वजेंद्र मिराशी , गौरव तुकाराम जोशी , अधिराज अभिनंदन बलवान , बॅकस्टेज – युवराज दत्तगुरु शिंदे या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या.
या नाटकाचे लेखन , दिग्दर्शन तसेच संगीत आज्ञा अभिषेक कोयंडे व नेपथ्य आणि प्रकाशयोजना अभिषेक नरहरी कोयंडे यांनी केले.
या नाट्यास सर्व विज्ञान शिक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले,या यशाबद्दल सर्व संस्थाचालक,तसेच मुख्याध्यापक महादेव घोलराखे, , पर्यवेक्षक निशा दहिबावकर ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
