देवगड(प्रतिनिधी)दि. ८ ऑगस्ट २०२४
अहमदनगर येथील “ मंथन वेलफेअर फाऊंडेशन” संस्थेने आयोजित केलेल्या “मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा “ परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील इयत्ता ५ वी चा विद्यार्थी कुमार: ध्रुव योगेश वालकर याने राज्यात ५२ वा क्रमांक पटकावला आहे.
त्याला गौरवपत्र व सन्मानशिल्ड प्राप्त झाले आहे . त्याला प्राथमिक विभागाचे शिक्षक श्री . चेतन पुजारे यांचे मार्गदर्शन लाभले .यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष- अजित गोगटे सचिव -प्रविण जोग ,शाळा समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर ,मुख्याध्यापक संजय गोगटे यांनी अभिनंदन केले आहे.
